राष्ट्र सेविका समितीचा प्रविण शिक्षा वर्गाचा समारोप

 राष्ट्र सेविका समितीचा प्रविण शिक्षा वर्गाचा समारोप

नागपूर, दि. २४(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्र सेविका समितीचा प्रविण शिक्षा वर्गाचा समारोप काल नागपुरातील भोसला मिलिटरी स्कूल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांतक्का उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात पंडवांनी गायिका पद्मश्री उषा बारले उपस्थित होत्या. महिलांनी भ्रम निर्माण करणाऱ्या विचारांपासून दूर राहावे सध्याच्या काळात त्यांनी वैचारिक योद्धा म्हणून काम करण्याची गरज आहे.

भारतीय नारी हे कार्य सक्षमपणे करू शकते याकरिता घराघरातून प्रबोधनाच्या आवश्यकतेवर भर देण्यात यावा असे आवाहन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. सेविकांना आपली भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी आणि ती पुढे नेण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन उषा बारले यांनी केले.
यावेळेला प्रवीण शिक्षा वर्गातील सेविकांनी घोषवादन, मानवंदना, ध्वजसंचलन, दंड, दंडयोग अशी विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली.

ML/ML/SL

24 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *