राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोअर ग्रुपची स्थापना

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची बांधणी आणि पक्षाच्या महत्वाच्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोअर ग्रुपची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल राष्ट्रीय, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यासंदर्भातील घोषणा केली. पक्षाची संघटन बांधणी, धोरणात्मक निर्णय, जनविकासाच्या योजनांची अंमलबजावणीसाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा हा कोअर ग्रुप असणार आहे. तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांसाठीचे कार्यक्रम आणि महत्वाच्या धोरणांची आखणी, अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्वाचा उद्देश असल्याच तटकरे यांनी स्पष्ट केलं.
ML/ML/PGB 14 Jan 2025