रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) आणि सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आज गृह विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने राज्याला शिफारस केलेल्या तीन नावांच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव प्रथम क्रमांकावर होते. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नव्हता अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांना ६ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
१९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. सशस्त्र सीमा बलाचे केंद्रप्रमुख, पुणे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.याशिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे.
ML/KA/SL
4 Jan. 2023