बहुगुणी, दुर्मिळ पिवळा पळस फुललाय काटेपूर्णा अभयारण्यात

 बहुगुणी, दुर्मिळ पिवळा पळस फुललाय काटेपूर्णा अभयारण्यात

वाशिम, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसंत ऋतू लागताच जंगलामध्ये पळस फुले बहरतात आणि लाल केशरी रंगाने संपूर्ण वसुंधरा बहरून जाते. मात्र वाशिम जिल्ह्यातील वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलेला आहे. हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून, औषधीसाठीही या पिवळ्या पळस फुलांचा वापर होत असल्याने या पळसाला विशेष महत्व आहे. काटेपूर्णा अभयारण्य परिसरात वसंत ऋतूत फुललेले हे पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

रंगाची उधळण करणारा होळी सण जवळ आली की हमखास आठवण होते ती पळसाच्या फुलांची. भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रानावनात बहरणारी लाल केशरी पळसफुले वसुंधरेच सौंदर्य खुलवतात. लाल केशरी पळसफुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात, मात्र पिवळा पळस हा अत्यंत दुर्मीळ समजला जातो. औषधीसाठीही या फुलांचा बहुआयामी उपयोग आहे असे तज्ञ सांगतात.

काटेपूर्णा अभयारण्य लगत वनोजा परिसरात असलेले हे पिवळ्या फुलांचे पळसाचे झाड आकर्षणाचा बिंदू बनलेले आहे आणि भविष्यात या झाडांच्या बिया गोळा करून वनविभाग तसेच निसर्गप्रेमी यांच्याद्वारे काटेपूर्णा अभयारण्यात बीज रोपण करून जास्तीत जास्त संख्येने पिवळ्या फुलांची पळसाचे झाडे वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी दिली.

ML/KA/SL

27 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *