दुर्मिळ प्राणी खवले मांजराला मिळाले जीवदान
सिंधुदुर्ग, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाट (गांधीनगर) येथे शंकर भगवान मराळ यांच्या शेतातील विहिरीत पडलेले अत्यंत दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवल्या मांजरास वनविभागाकडून यशस्वी सुटका करून जीवदान देण्यात आले. सावंतवाडी वन विभागाला पाट (गांधीनगर) येथे विहिरीत वन्यप्राणी खवल्या मांजर पडले असलेबाबत माहिती मिळाली.त्यानुसार कुडाळ वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अधिकारी संदीप कुंभार यांचे नेतृत्वाखाली जलद बचाव पथक दाखल होत वनविभागाच्या रेस्क्यू टीमकडून नायलॉन जाळीच्या साह्याने विहिरी मधून यशस्वीरित्या खवल्या मांजराची सुटका करण्यात आली. खवल्या मांजराची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार करून नंतर खवल्या मांजरास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
ML/ML/SL
6 Oct. 2024