अकोल्यात दुर्मिळ पुरातन प्रभू श्रीराममूर्ती
अकोला, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना हे गाव हरिविजय ग्रंथानुसार अर्जुनपुत्र बाब्रुवनाने माणिपूर म्हणजेच आजचे माना नावाचे गाव वसविले आहे. उमा नदीच्या तीरावर हे अतिप्राचीन शहर बब्रुवानाने वसविले होते. प्रभू रामाची दुर्मिळ आणि पुरातन काळ्या पाषाणतील अशी कसोटीचा दगड मूर्ती बनविण्यासाठी वापरला आहे.
हजारो वर्ष पुरातन श्रीरामाची मूर्ती सन 3 जुलै 1932 मध्ये उमा नदीच्या किनाऱ्यावरील गढीवजा किल्याजवळ जमिनीखाली असलेली पालथी मूर्ती ग्रामस्थांना मिळाली.
ब्रिटिश सरकारने मूर्ती नागपुरातील पुरात्त्व संग्रहलयात नेण्याची तयारी केली तेव्हा गावाकऱ्यांनी सत्याग्रह केला आणि मूर्ती गावातच ठेवण्यासाठी ब्रिटिश शासनाला बाध्य केले आणि गावातच एक छोटे मंदिर बांधले. पुढे 8 मे 1951 रोजी गावातील एका शेतात अशीच एक सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती जमींनी खाली मिळाली.काही वर्षांपूर्वी श्रीविष्णुची आणखी केलं सुबक मूर्ती मिळाली. या तिन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा माना गावात रामकृष्ण मंदिरात स्थापित केली आहे. नाशिक रामटेक किंवा अयोध्या एव्हढेच महत्व माना गावाला आणि गावातील रामकृष्ण मंदिराला आहे हे विशेष.Rare ancient Lord Sri Ramamurthy in Akola
ML/ML/PGB
17 Apr 2024