प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याचे दोन्ही युट्यूब चॅनेल्स हॅक

 प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याचे दोन्ही युट्यूब चॅनेल्स हॅक

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाचे दोन्ही यूट्यूब चॅनेल हॅक झाले आहेत. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. त्याचे दोन्ही यूट्यूब चॅनेल सायबर क्रिमिनल्सनी हॅक केले असून चॅनलचे नावही बदलले आहेत. चॅनलचे नाव बदलून ‘टेस्ला’ ठेवण्यात आले आहे. रणवीरचे युट्यूब चॅनल हॅक करून बीअर बायसेप्सचे नाव @Elon.trump.tesla_live2024 असे बदलले आहे. तर त्याच्या पर्सनल चॅनेलचे नाव बदलून @tesla.event.trump 2024 असे केले आहे.
रणवीरने २२ व्या वर्षी त्याचे पहिले यूट्यूब चॅनेल बीअर बायसेप्स सुरू केले. आता त्याचे सात यूट्यूब चॅनल आहेत. त्याच्या सर्व चॅनेलचे जवळपास १२ मिलियन फॉलोअर्स आहेत. सातपैकी दोन चॅनल हॅक झाले असून सगळे व्हिडीओ डिलीट झाले आहेत. हे चॅनल युट्यूबरवर सर्च केल्यावर एक मेसेज दिसतोय. त्यात कंपनीच्या पॉलिसींचे उल्लंघन केल्यामुळे ते काढून टाकण्यात आले आहे, असं लिहिलंय. तर लाइव्ह स्ट्रीमिंग पेजवर हे पेज उपलब्ध नाही, असं दिसतंय.

PGB/ML/PGB
26 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *