पोलीसांना चकवा देवून रणवीर अलाहाबादीया झाला गायब

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडीया गॉट लेटंट या समय रैनाच्या शोमध्ये अश्लिल आणि बिभत्स वक्तव्य करणारा, देशभरातून टिकेचा वर्षाव होणारा रणवीर अलाहाबादीया गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. रणवीरच्या मुंबईतील घरी पोलीस पोहोचले असता त्याच्या घराला कुलूप दिसले. त्याचा फोन ही लागत नाहीये. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शुक्रवारी न्यायालयाने या प्रकरणाची तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आणि रणवीरच्या याचिकेवर काही दिवसांत सुनावणी होईल असे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर किंवा त्याचे वकील मुंबई पोलिसांच्या संपर्कात नाहीत. मुंबई पोलिसांनी रणवीरला समन्स बजावले आहे आणि तो पोलिस स्टेशनमध्ये येऊन त्याचा जबाब नोंदवण्याची वाट पाहत आहेत. पण आता रणवीरने त्याचा फोन बंद केला आहे आणि तो बेपत्ता झाला आहे. पोलीस जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला कुलूप होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अनेक हाय प्रोफाइल राजकारणी, कलाकार यांनी त्यांच्या बिअर बायसेप या शोमध्ये हजेरी लावली होती. गेल्यावर्षी त्याला पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरवण्यात आले होते. अशा रितिने युट्युबवरुन करोडोंची कमाई करणारा रणवीर हा एक हाय प्रोफाईल केस झाला होता. त्यामुळे इतर प्रसिद्ध गुन्हेगारांना गायब होण्यास पुरेसा अवधी देण्याच्या ट्रेंड असलेल्या आपल्या देशात रणवीरचे पोलीसांच्या हातावर तुरी देत गायब होणे,याबाबत नेटकऱ्यांना फारसे आश्चर्य वाटलेले नाही.
SL/ML/SL
14 Feb. 2025