आक्षेपार्ह प्रश्नावरून रणवीर अलाहबादिया ट्रोल, पोलीस आयुक्त, महिला आयोगाकडे तक्रार

 आक्षेपार्ह प्रश्नावरून रणवीर अलाहबादिया ट्रोल, पोलीस आयुक्त, महिला आयोगाकडे तक्रार

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहबादिया हा स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लॅटेंट या शोमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला. या शो मधील ती व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यावरून संतापाची लाट उसळली असून लोकांनी रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरूवात केली आहे. इतकंच नाही तर, रणवीरची मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे.रणवीरच्या व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ते म्हणाले की,’अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा आहेत. समाजात अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत. त्याची हद्द ओलांडली तर त्यावर कारवाई केली जाईल. यामुळे रणवीरवर आता खरच कारवाई होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *