रानटी हत्तीने पायदळी तुडवून शेतकरी ठार ….

सिंधुदुर्ग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मोर्ले गावामध्ये एका रानटी हत्तीने लक्ष्मण गवस या 70 वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केले. लक्ष्मण गवस नेहमीप्रमाणे सकाळी शेतामध्ये गेले होते. काही काळ उलटूनही ते घरी न परतल्याने त्यांचे बंधू रमाकांत गवस त्यांना पाहण्यासाठी जात असता वाटेतील झाडाखाली लक्ष्मण गवस पडलेले होते. त्यांच्या अंगावर हत्तीने पाय दिल्याच्या खुणा होत्या .तसेच आजूबाजूला हत्तीच्या पायाचे ठसे उमटलेले होते. वनविभागाने देखील हा मृत्यू रानटी हतीने केलेल्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या मोर्ले गावातील ग्रामस्थांनी वन विभागाला धारेवर धरत घटनास्थळी ठिय्या मांडला होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर या हत्तीला पकडण्याची परवानगी वन विभागाने दिली आहे. वन विभागाकडून मयत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
ML/ML/PGB 9 April 2025