राणीचा बाग बुधवारी सुरु तर गुरुवारी राहणार बंद

 राणीचा बाग बुधवारी सुरु तर गुरुवारी राहणार बंद

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क): भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवार १८ सप्टेंबर रोजी जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आधार घेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सोमवारी १६ सप्टेंबर रोजी पूर्वी घोषित केलेली सार्वजनिक सुटी रद्द करून त्या ऐवजी बुधवारी १८ सप्टेंबर या दिवशी जाहीर केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार, बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱया दिवशी बंद ठेवण्यात येते.

या ठरावानुसार भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवारी १८ सप्टेंबर रोजी खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी १९ सप्टेंबर २०२४ रोजी बंद ठेवण्यात येणार आहे,असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.

SW/ML/SL

16 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *