रानगव्याच्या झुंजीत वाघाची माघार

 रानगव्याच्या झुंजीत वाघाची माघार

चंद्रपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांचा मुक्तसंचार बघायला मिळत आहे. अशातच ताडोबाच्या मोहर्ली बफर झोनमध्ये वाघ अतिशय शांतपणे पाणतळ्याच्या काठावर बसला होता. तेथे रानगवा आणि इतर पक्ष्यांचे थवे होते, अशातच वाघ अचानक एका रानगव्यावर झडप घालतो मात्र दुसऱ्या रान गव्याच्या रौद्र रूपाने त्याला धूम ठोकावी लागल्याची थरारक घटना घडली आहे.

शिकार करण्याच्या इराद्याने वाघाने रान गव्याची मान जबड्यात घट्ट पकडली. नेमका त्याच वेळी दुसरा रानगवा आपल्या एका सोबत्याची वाघ शिकार करीत असल्याचे पाहून वाघाच्या दिशेने धावत आला. रानगव्याचे ते रौद्ररूप पाहून वाघाने घाबरून जीव मुठीत घेऊन अक्षरशः पळ काढला. हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


अतिशय चपळाईने रानगव्याची शिकार करण्यासाठी वाघाने झडप घेतली खरी परंतू एकीचे बळ पाहून वाघाला देखील पळ काढावा लागला.

ML/KA/PGB 18 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *