योगगुरू रामदेव बाबांचे महिलांबद्दल वादग्रस्त विधान
ठाणे,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सेलिब्रिटी योगगुरू रामदेवबाबा योग प्रशिक्षण शिबिरांबरोबरच वादग्रस्त विधानांसाठीही नेहमीच चर्चेत असतात. आज त्यांनी ठाणे येथील कार्यक्रमात महिलांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य मात्र त्यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा या आक्षेपार्ह विधानाबद्दल राज्यभर निधेषात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
“साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे विधान रामदेव बाबा यांनी केले आहे.
आज ठाण्यातील हायलँड भागात पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांशी संवाद साधताना रामदेव बाबांनी वरील वादग्रस्त विधान केले आहे.
या कार्यक्रमात अमृता फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होत्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे योगशिबिर आयोजित केले होते.
Ramdev Baba’s Controversial Statement About Women
SL/KA/Sl
25 Nov. 2022