गरीब मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई , दि 1~ गरीब मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला पाहिजे.सातारा आणि हैदराबाद च्या गॅझेट चा शासनाने अभ्यास करून गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे.गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे.गरीब मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळण्यासाठी राज्य सरकार ने लवकर मार्ग काढून मराठा नेते मनोज जरांगे यांचे उग्र होणाऱ्या आंदोलनाचा लवकर समारोप झाला पाहिजे असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आज बांद्रा येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ना.रामदास आठवले बोलत होते.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली.मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्वरीत मार्ग काढण्याची विनंती ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना केली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
गरीब मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षणाचा कायदा यापूर्वीच केला आहे.त्यानुसार शिक्षण आणि नोकरी मध्ये मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळत आहे.मराठा समाजाचे आरक्षणा कायद्याद्वारे कोर्टात टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल.गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास त्यांना सामाजिक न्याय मिळेल.मात्र गरीब मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची राज्य सरकारने खबरदारी घेतली पाहिजे असे मत न.रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
ओबीसी समाजाच्या संख्येच्या तुलनेत ओबीसी समाजाला आधीच कमी आरक्षण मिळाले आहे.त्यामुळे ओबीसी च्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊन ओबीसींवर अन्याय होता कामा नये. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध आहे. सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही.ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी मिळाल्या आहेत त्यांना जरूर कुणबी म्हणून आरक्षण दिले पाहिजे.त्यासाठी राज्य सरकारने सातारा आणि हैदराबाद गॅझेट चा अभ्यास गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चा लवकर निर्णय घेऊन मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सांगता करावी असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी आज केले.KK/ML/MS