केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई, दि १
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज श्री गणेशोत्सव निमित्त आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ना. रामदास आठवले यांचा स्नेहपूर्ण आदर सत्कार केला.यावेळी ना.रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले; रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे एम एस नंदा तसेच भाजप चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS