12 एप्रिल पासून भाजप एनडीए उमेदवारांचा रामदास आठवले करणार प्रचार

 12 एप्रिल पासून भाजप एनडीए उमेदवारांचा रामदास आठवले करणार प्रचार

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे १२ एप्रिल पासून छत्तीसगड , मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एनडीए चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे एन डी ए चे राष्ट्रीय स्तरावर स्टार प्रचारक ठरले आहेत. देशभर सर्व राज्यांत भाजप उमेदवार आपल्या प्रचारासाठी रामदास आठवले यांची सभा आयोजित करीत आहेत.
ना.आठवले येत्या १२ एप्रिल रोजी छत्तीसगड मधील रायपूर येथे भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.१३ एप्रिल रोजी मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे भाजप उमेदवरांचा
ते प्रचार करणार आहेत तर १४ एप्रिल रोजी सकाळी दिल्लीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संसदेत आयोजित कार्यक्रमात ना . आठवले उपस्थित राहतील. तसेच त्याच दिवशी १४ एप्रिल रोजी दुपारी ना . आठवले मुंबईत चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करणार आहेत.त्यानंतर १५ एप्रिल रोजी ते आसाम चा दौरा करणार असून आसाम मध्ये हेलिकॉप्टर द्वारे प्रचार दौरा करणार आहेत. आसाम मध्ये रिपब्लिकन पक्षाचे ५ उमेदवार लोकसभा निवडणुक लढत आहेत. त्यानंतर १७ एप्रिल रोजी ना. आठवले राजस्थान मधील जयपूर येथे भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
असे रिपाई तर्फे कळवण्यात आले आहे.

Ramdas Athawale will campaign for BJP NDA candidates from April 12

ML/ML/PGB
11 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *