आम्हाला किमान एक मंत्री पद मिळावे

नागपूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला किमान एक मंत्री पद मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भातील किमान एक जागा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर मध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली. दलितांवर वर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात 9 जुलै 1972 रोजी दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना झाली होती या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त नागपुरात आज सायंकाळी दलित पॅंथर संघटनेमध्ये काम केलेल्या निवडक कार्यकर्त्यांचा सत्कार होणार आहे, त्याकरिता रामदास आठवले नागपुरात आले होते. पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी समारोप 9 जुलै रोजी औरंगाबादला होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, या शिष्यवृत्तीसाठी 60 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून येते तर 40 टक्के रक्कम राज्य सरकार भरते. केंद्र सरकारकडून सरकारकडून या शिष्यवृत्तीसाठी सर्व निधी दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ML/KA/PGB 6 Jun 2023