रामभद्राचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून लष्कर प्रमुखांकडे केली PoK ची मागणी

 रामभद्राचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून लष्कर प्रमुखांकडे केली PoK ची मागणी

चित्रकूट, दि. ३० : प्रख्यात आध्यात्मिक गुरु, संस्कृत विद्वान अनेक धार्मिक ग्रंथांचे लेखक जगद्गुरु रामभद्राचार्य हे लष्कर प्रमुखांकडे केलेल्या अनोख्या मागणीमुळे चर्चेत आले आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्या आश्रमाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी लष्करप्रमुखांनी राम मंत्राची दीक्षा घेतली. या भेटीत जगद्गुरूंनी थेट पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणण्याची गुरुदक्षिणाम्हणून मागणी केली.या भेटीत जगद्गुरूंनी सांगितले की, त्यांना त्याच राममंत्राची दीक्षा देण्यात आली आहे, जो मंत्र प्रभू हनुमानाला सीता मातेला वाचवण्यासाठी लंकेला प्रस्थान करण्याआधी देण्यात आला होता. यावेळी लष्करप्रमुख आणि जगद्गुरु यांच्यात आध्यात्मिक संवाद झाला आणि त्यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले की, मी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून दक्षिणेत पीओके मागितले आहे. लष्करप्रमुखांचा सन्मान करताना मला अभिमान वाटला. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरूंची ही मागणी, विशेष ठरते. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारताने या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ नष्ट केले होते. 4 दिवस चाललेल्या प्रतिकारानंतर 10 मे रोजी युद्धविराम जाहीर झाला असला तरी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच आहे, असं संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *