ठाण्यात होतोय रामायण महोत्सव…

 ठाण्यात होतोय रामायण महोत्सव…

ठाणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक मंगल सोहळ्याची अनुभूती ठाणेकरांना देण्यासाठी सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार, आयसीसीआरचे अध्यक्ष, आणि भाजपाचे राष्ट्रीय नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी रामायण महोत्सवाचे आयोजन केलं आहे.

गावदेवी मैदानात शनिवार दिनांक 20 जानेवारी ते सोमवार दिनांक 22 जानेवारी दरम्यान होणाऱ्या रामायण महोत्सवात विविध कार्यक्रम योजले आहेत. “मन राम रंगी रंगले” चा आनंद हा रामायण महोत्सव देईल. या अभिनव रामायण महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी होणार आहे. “विजयी पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी” याचा प्रत्यय रामायण महोत्सवातील कार्यक्रम देतील असे महोत्सावाचे आयोजक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि संयोजक सुजय पतकी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्रीराम जीवन दर्शन घडवणाऱ्या सुबक, सुंदर सत्तावीस रांगोळ्या हे महोत्सवाचे आकर्षण असेल. 1528 ते 2024 पर्यंत श्रीराम मंदिर मुक्ती अभियान आणि जन्मस्थानी मंदिर उभारण्याचा निर्धार यातील विविध टप्यावर माहितीपूर्ण चित्र प्रदर्शनी हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. कारसेवक हुतात्मा स्तंभ उभारला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची श्रीराम जीवनातील विविध प्रसगांवर चित्र कला स्पर्धा होणार आहे, अशी माहिती डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली.

वीस रोजी सायंकाळी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांचे राष्ट्रनिर्माते प्रभू श्रीराम होणार आहे. दिनांक एकवीस रोजी सायंकाळी संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर रोजी यांनी रचलेला राम गाईन आवडी गीत संध्या कार्यक्रम होईल. दिनांक बावीस रोजी सायंकाळी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले, गायलेले अजरामर गीत रामायण श्रीधर फडके सादर करतील. रोज सायंकाळी सामूहिक रामरक्षा पठण होणार आहे. बावीस रोजी अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या रामायण महोत्सवातून ठाण्यात श्रीराम विचार, कार्याचे जागरण करण्यावर भर दिला जाईल. या महोत्सावाला ठाणेकर उदंड प्रतिसाद देऊन सामील होतील, असा विश्वास डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि सुजय पतकी यांनी व्यक्त केला. Ramayana festival is happening in Thane…

ML/KA/PGB
11 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *