रामाचा वनवास बारा वर्षांचा, आदिवासींचा मात्र ३५ वर्षांचा

 रामाचा वनवास बारा वर्षांचा, आदिवासींचा मात्र ३५ वर्षांचा

नंदुरबार, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामाने तर फक्त १२ वर्षाचा वनवास भोगला पण काँग्रेसचा निष्क्रिय आमदार निवडून दिल्याने अक्कलकुवा आणि धडगांव तालुक्यातील आदिवासी बांधव गेल्या ३५ वर्षांपासून वनवास भोगत आहे. हा वनवास संपवून या भागाचे नंदनवन करावयाचे असल्यास शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार जिल्हयातिल दुर्गम भागात असलेल्या धडगांव येथे केले. ते आज अनुसुचित जमातीसाठी आरक्षित अक्कालकुवा विधानसभा मतदारसंघातिल महायुतितिल शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्या प्रचार रॅलित बोलत होते.

त्यांनी माता देवमोगरा आणि आदिवासी वीर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आदिवासी बोलीभाषेतून भाषणाची सुरुवात केली. यावेळी भाजपा, शिवसेना तसेच राष्ट्रवादी पक्षांचे जिल्हयातिल पदाधिकारी उपस्थित होते. या भागाचा विकास करण्यासाठी या रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी या भागात एमायडिसी ची निर्मिती करुन मजुरांचे पुर्णपणे स्थलांतर रोखण्याचे प्रयत्न केले जातील.

दुर्गम भागात अद्यावत दवाखाने आणि रस्त्यांचे जाळे विणुन बांबुलंस पुर्णपणे हद्दपार करण्यात येईल, आचारसंहिता संपल्या नंतर लगेच धडगावला आणखी अँम्बुलंस देण्यात येतील.
नदिजोड प्रकल्प राबवून नर्मदेचे पाणी धडगांव तसेच मोलगी पर्यंत आणले जाईल, मोलगी शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात येईल असे अश्वासन देत मुख्यमंत्रयांनी आदिवासी जनतेसाठी शासन मोठ्या प्रमाणात योजना रावित असल्याचे सांगत विविध योजनांची माहिती दिली. विशेषकरुन लाडकी बहिण योजना, शेतीविज बिल माफ योजना, शेतकरिंना दिली जाणारी १२ हजारांची मदत, पिक विमा, सामान्यांना विजबिलात ३०% माफ या योजना आदिवासी भागाचा विकास करणार्या असल्याचे त्यांनी सांगितले.

सुमारे एक लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देऊन धडगांव तालुका दोन नंबरवर असल्याने मुख्यमंत्रयांनी तालुक्यातील पदाधिकारिंचे आभार मानले. अंगणवाडी सेविकांना १५ हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला असून महिलांना लखपती बनवायचे आहे. डिसेंबर महिण्यात लाडकी बहिणचे पुढचे हप्ते खात्यात येतिल, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे विद्यमान आमदार निवडून आल्यानंतर मुंबईतच राहत असल्याने या भागाचा विकास झाला नाही असे आरोप करीत त्यांनी जमिनिवर राहणारा आमदार निवडून द्या असे आवाहन केले. मी सी. एम. म्हणजे काॅमनमॅन आहे. सामान्य माणसांना सुपरमॅन बनवायचे आहे असे सांगत रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत जनतेची सेवा करित राहणार असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात अक्कलकुवा तालुका एक नंबरचा विधानसभा मतदारसंघ आहे. आपण शिवसेनेचा आमदार निवडुन विजयाचा सिताफळ फोडा आम्ही हा मतदारसंघाला विकासाच्या बाबतित नंबर वन करू हा माझा शब्द आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पक्षाचा वचननामा जाहिर केला.

ML/ML/SL

17 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *