रमाबाई नगर पुनर्विकासासाठी एमएमआरडीएला १५०० कोटींचे कर्ज

 रमाबाई नगर पुनर्विकासासाठी एमएमआरडीएला १५०० कोटींचे कर्ज

रमाबाई नगर पुनर्विकासासाठी एमएमआरडीएला १५०० कोटींचे कर्ज

मुंबई दि २० — मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) समावेशक गृहनिर्माण आणि शाश्वत नागरी पायाभूत सुविधांसाठीच्या आपल्या प्रयत्नांना मोठे यश मिळवले आहे. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर पुनर्विकासासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१५०० कोटींचा कर्जपुरवठा मिळवण्यात आला आहे. हा एमएमआरडीएचा पहिलाच थेट झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प असून, एकूण ₹८४९८ कोटींच्या (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्पाच्या अर्थसंकल्पातील हे पहिले महत्त्वाचे आर्थिक संधारण (financial closure) ठरते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली हा महत्वाकांक्षी प्रकल्प जुने आणि अतिदाट वस्तीचा झोपडपट्टी समूह असलेल्या भागाचे सन्मानित आणि नियोजनबद्ध गृहनगरात रूपांतर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेसाठी एमएमआरडीएने विविध स्त्रोतांद्वारे निधी उभारणीची रणनीती आखली आहे. एकूण ₹८४९८ कोटींच्या प्रकल्पापैकी ₹३९१६ कोटी कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. यातील ₹१५०० कोटींचा पहिला हप्ता बँक ऑफ महाराष्ट्रकडून मंजूर झाला आहे. या कर्जाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या वेळेत अंमलबजावणीस यामुळे गती मिळणार आहे. यामुळे एमएमआरडीएच्या आर्थिक नियोजन व अंमलबजावणी क्षमतेवरही शिक्कामोर्तब झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले:
“हा पुनर्विकास प्रकल्प म्हणजे समतोल, भविष्योन्मुख मुंबईकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. सरकारचा उद्देश केवळ घरे देणं नाही, तर समुदायांना स्वतःचं जग उभारण्याची संधी देणं आहे. प्रत्येक नागरिकाला योग्य संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने आणि जबाबदारीने काम करत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्विकासाच्या अडचणींवर आता ठोस पावले उचलली जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या प्रकल्पांना यशस्वीपणे पूर्ण करता यावं यासाठी सरकारने शाश्वत आर्थिक मॉडेल तयार केलं आहे. ही केवळ योजना नाही, तर लोकांचा आत्मविश्वास परत मिळवण्याचा आणि एक समावेशक, न्याय्य शहरी विकास घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

मा. उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले, “₹१५०० कोटींच्या कर्ज मंजुरीमुळे महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडीएच्या सामाईक दृष्टिकोनावर भरवसा निर्माण झाला आहे. रमाबाई नगरमधील हजारो कुटुंबांच्या जीवनात हा प्रकल्प मोठा सकारात्मक बदल घडवून आणेल—त्यांना चांगली घरे, उज्ज्वल भविष्य आणि भक्कम भक्कम समाज निर्माण होईल.”

डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले,

हा केवळ पुनर्विकास प्रकल्प नाही, तर समावेशक आणि स्वयंनिर्भर नागरी पुनरुत्थानाचा आराखडाच आहे. पूलावर खर्च होणाऱ्या एकूण निधीपैकी ४६% रक्कम संस्थात्मक कर्जाच्या माध्यमातून आणि ३९% अंतर्गत महसुलाच्या माध्यमातून उभारून एमएमआरडीए आर्थिक शिस्त राखत आहे आणि लोककेंद्रीत विकास साधत आहे. रमाबाई नगरचा पुनर्विकास हा संपूर्ण महानगर प्रदेशासाठी आदर्श ठरेल.ML.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *