रामायण मालिकेतील राम-सीता दिसणार या ऐतिहासिक भूमिकेत

 रामायण मालिकेतील राम-सीता दिसणार या ऐतिहासिक भूमिकेत

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामायण मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया आता एका ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहे. श्रीरामनवमीच्या निमित्तानं या दोघांचं एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. ‘वीर मुरारबाजी.. पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.

ऐतिहासिक चित्रपटात एकत्रित काम करण्याचा योग या निमित्तानं जुळून आला असून या भूमिकेसाठी आम्ही तितकेच उत्सुक होतो, असं हे दोघे सांगतात. छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका करायला मिळणं आमच्यासाठी खूपच आनंददायी होतं. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते, असं प्रांजळ मत या दोघांनी व्यक्त केलं.

पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी…पुरंदर की युद्धगाथा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अजून जाहीर झालेले नाही.

SL/ML/SL

5 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *