राम मंदीर हा आमच्यासाठी राजनैतिक नव्हे तर अस्मितेचा विषय
अयोध्या, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्येला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले आणि प्रस्तावित मंदीर प्रकल्पाची पहाणी केली. शिवसेनेच्या गटाला ‘धनुष्य आणि बाण’ चिन्ह मिळाल्याचे चिन्ह प्रभू रामाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत, असे प्रतिपादन करत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी अयोध्येमध्ये हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य महाराष्ट्र भवन उभारले जाईल. अशी घोषणा केली.
“आजचा हा दिवस माझ्यासाठी अभूतपूर्व असा दिवस आहे. मंदीर हा आमच्यासाठी राजकीय नव्हे तर अस्मितेचा विषय आहे. राममंदीर उभारणी हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न होते, ते स्वप्न आज येथे प्रत्यक्षात साकारत आहे. हे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्णत्वास नेत आहेत”. अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या दौऱ्याचा काहींना त्रास झाला, कारण त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर सर्वांच्या घराघरात, मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीमुळे हे लोक हिंदुत्वाला, हिंदू धर्माला विरोध करत आले आहेत.
SL/KA/SL
9 April 2023