पुण्यात राम आणि श्याम यांचा शुभविवाह

 पुण्यात राम आणि श्याम यांचा शुभविवाह

पुणे, दि. १७ : पुण्यात श्रीराम श्रीधर आणि श्याम कोन्नूर यांचा समलैंगिक विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. ‘मिस्ट एलजीबीटीक्यू फाउंडेशन’चे सह-संस्थापक श्याम आणि राम हे जोडपे विवाहबद्ध झाले. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या या भव्य विवाहसोहळ्यात पारंपरिक हिंदू आणि ख्रिश्चन विधी, ढोल-ताशांचा गजर, आणि समुदायाचा जिव्हाळा यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले.

तीन दिवस चाललेल्या या विवाह समारंभात हळदी, मेहंदी, संगीत असे सर्व पारंपरिक सोहळे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. पहिल्या दिवशी दाक्षिणात्य हिंदू परंपरेनुसार विवाह पार पडला. तर संध्याकाळी ख्रिश्चन विधी झाले.

सध्या त्यांच्या विवाहसोहळ्याचे हे सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खास फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोशूटमध्ये पारंपरिक धोतर-कुर्ता, फुलांची माळ आणि मंगलाष्टकाच्या पार्श्वभूमीने भरलेल्या क्षणांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *