मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी बीडमध्ये निषेध मोर्चा…
बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये आज सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
दिवंगत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून ,फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत आज दुपारी बीड मध्ये निषेध मोर्चाला।सुरुवात करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी छत्रपती संभाजी राजे, मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेल्या या निषेध मोर्चात सर्व पक्षीय, सर्व जातीय,धर्मीय नागरिक सहभागी झाले होते.
ML/ ML/ SL
28 Dec. 2024