विदर्भातील ‘रक्तपुष्प’ नाटकाचा मुंबईत प्रयोग

 विदर्भातील ‘रक्तपुष्प’ नाटकाचा मुंबईत प्रयोग


मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महेश एलकुंचवार लिखित व रमेश लखमापूरे दिग्दर्शित आणि डॉ. संयुक्ता थोरात निर्मित स्त्री संवेदनांचे पदर उलगडणारा ‘रक्तपुष्प’ या विदर्भातील नाटकाचा प्रयोग मुंबईत 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता मुंबईच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे सादर करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला पदमश्री वामन केंद्रे, माजी निर्देशक, राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली प्रमुख अतिथी म्हणून उपथित असणार आहेत. या आधी या नाटकाचे काही प्रयोग नागपूर मध्ये देखील सादर करण्यात आलेले आहे, ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

‘रक्तपुष्प’ हे लेखक महेश एलकुंचवार यांचे गाजलेले नाटक असून यात स्त्री जीवनाची व्यथा अत्यंत नव्या अंगाने मांडण्यात आलेली आहे. व्यावसायिक नाटकांचे चलन असतांना निर्माती डॉ. संयुक्ता थोरात यांनी या प्रायोगिक नाटकाला प्रेक्षकांपुढे सादर करण्याचा निर्णय घेऊन संयुक्त कला मंचाच्या माध्यमांतून मराठी रंगभूमीला एक नवी दिश्या देण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केलेले आहे. तसेच दिग्दर्शक म्हणून रमेश लखमापूरे यांनी या संहितेला रंगमंचावर साकार करतांना नाविन्य शोधायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

या नाटकात विनय मोडक आणि दीपलक्ष्मी भट सारख्या कसलेल्या कलाकारांबरोबर अभिनय क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या हिमानी पंत आणि सत्यम निंबूलकर यांच्या अभिनयाची झलक देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या नाटकात नैपथ्य – पुष्कर भट, संगीत – ब्रिजेश पंत, रंगभूषा- नकुल श्रीवास, वेशभूषा – दीपलक्ष्मी भट यांचे असून प्रकाश योजनेची संपूर्ण जबाबदारी रमेश लखमापुरेंनी स्वतः स्वीकारलेली आहे तसेच मंच व्यवस्थेची संपूर्ण जवाबदारी पुष्कर भट व नाना मिसाळ यांच्याकडे असणार आहे. ‘Raktpushpa’ play from Vidarbha is experimented in Mumbai
हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी निशुल्क असणार आहे. या नाटकाचा मुंबईतील नाट्यप्रेमी मंडळीने आस्वाद घ्यावा असे ,आवाहन
निर्माती डॉ. संयुक्ता थोरात यांनी पत्रकार परिषदेत केले.

ML/KA/PGB
12 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *