वरळी येथे रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

मुंबई, दि १७
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त वरळी येथे शिवसेना माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात 200 पेक्षा जास्त बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. यावेळी रक्तदान करणाऱ्या योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही नेहमी समाजात विविध सामाजिक शैक्षणिक आणि समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. समाजसेवेचा एक भाग म्हणून आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी दिली.
यावेळी शिवसेना नेत्या सुशिबेन शाह, प्रवक्ते राजू वाघमारे , महिला विभागप्रमुख रत्ना महाले, शाखाप्रमुख राजेश पांडे, पूजा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांनी विशेष सहकार्य केले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या तेरापंथ युवक परिषद दक्षिण मुंबई यांचे विशेष आभार मानले.KK/ML/MS