राकेश परब यांना पर्यावरणमित्र पुरस्काराने गौरविले

 राकेश परब यांना पर्यावरणमित्र पुरस्काराने गौरविले

बांदा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेतर्फे शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रामध्ये योगदान दिल्याबद्दल येथील राकेश परब यांना ‘पर्यावरणमित्र’ सन्मानाने गौरविण्यात आले. कुडाळ येथील मराठा हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. परब हे गेली २३ वर्षे शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण अशा विविध उपक्रमांत सहभागी होऊन आपले कार्य करत आहेत. या कार्याची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांनी त्यांना सन्मानित केले. व्यासपीठावर कुडाळ तालुका गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, परब मराठा समाजाचे विनायक परब, पर्यावरणप्रेमी डॉ. बापू भोगटे, रामचंद्र परब, बापू परब, जोईल डिसिल्व्हा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक कार्ये करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात आले. बापू परब यांनी सूत्रसंचालन केले. गावडे यांनी आभार मानले.Rakesh Parab was felicitated with the Environment Friend Award

ML/KA/PGB
5 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *