हिंदू राष्ट्र होण्यासाठी समर्पण भावनेने योगदान द्या – महंत श्री राजुदास महाराज

 हिंदू राष्ट्र होण्यासाठी समर्पण भावनेने योगदान द्या – महंत श्री राजुदास महाराज

पुणे, दि २८
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने, विश्वाला शांती आणि संयमाचा मार्ग दाखवणारे ज्ञानेश्वर माऊली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर सर्वांनी संकल्प करावा की, सर्वांना सामावून घेणारा एकमेव धर्म म्हणजे सनातन धर्म आहे. याची पताका जगात उंचावण्यासाठी आणि भारत देश हिंदू राष्ट्र होण्यासाठी सर्वांनी समर्पण भावनेने योगदान द्यावे असे आवाहन अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढीचे महंत श्री श्री १००८ श्री राजुदास महाराज यांनी केले.
उत्तर भारतात आणि विशेषतः बिहार मध्ये सूर्याची उपासना करून छटपुजेचे व्रत मोठ्या भक्तीभावाने केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे अशी सनातन काळापासूनची धारणा आहे असेही महंत श्री राजुदास महाराज यांनी सांगितले.
गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने संस्थापक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर सोमवारी छटपूजा श्री सूर्यषष्ठी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पारंपरिक पद्धतीने महंत श्री राजुदास महाराज यांच्या हस्ते इंद्रायणी मातेचे पूजन करण्यात आले. यानंतर गंगा आरती करण्यात आली.
यावेळी आमदार महेश लांडगे, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, माजी महापौर राहुल जाधव, आयोजक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने, सुधीर काळजे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, विकास पाटील, प्रमोद गुप्ता, श्याम गुप्ता, दीपक चव्हाण, विजय पाटील, संदीप साकोरे व छटपूजा निमित्त आलेले भक्त भाविक उपस्थित होते.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, छट माता तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, अशी मी प्रार्थना करतो आणि सर्व हिंदू भगिनींचे रक्षण करण्यासाठी छट मातेने मला शक्ती द्यावी असे आशीर्वाद मागतो.
विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर म्हणाले की, या सूर्यषष्ठी महोत्सवात छट मातेचे व्रत केले जाते. निसर्गात आणि समाजात एकरूपता यावी. सर्वांचे कल्याण व्हावे, पिक पाणी मुबलक यावे, यासाठी सूर्याला अर्ध्य देऊन त्याची उपासना केली जाते. सनातन धर्मात नदीला मातेचा दर्जा आहे. या महोत्सवात मातेचे पूजन करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश जगभर दिला जातो.
स्वागत,प्रास्ताविक करताना श्री विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी सांगितले की, महंत श्री राजुदास महाराज हे प्रभू श्री रामाची जन्मभूमी अयोध्या येथून प्रभू श्री रामाचे दूत म्हणून आशीर्वाद देण्यासाठी प्रथमच पुण्यनगरीत आले आहेत. त्यांनी भारत देश अखंड हिंदुराष्ट्र व्हावे असा केलेला संकल्प पूर्ण होण्यासाठी श्री विश्व श्रीराम सेना कायम त्यांच्या सोबत राहील. मोशी येथील इंद्रायणी नदीघाट येथे भोसरी, मोशी, पिंपरी नेहरू नगर, चिंचवड़, चिंबळी, कुरुळी, कोयाळी, चाकण, मोशी, जाधववाडी, चिखली, निघोजे, आकुर्डी, तळवडे, आळंदी कृष्णानगर आदी भागातून भक्त भाविक उपस्थित होते. यावेळी पारंपरिक पूजा करून भजन, छट लोकगीते सादर करण्यात आली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *