महायुतीतर्फे राजश्री पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
यवतमाळ, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोटी कपडा और मकान देणारे पंतप्रधान आहेत. याशिवाय 370 कलम , राम मंदिराची निर्मिती , बेरोजगारांना नोकऱ्या अशी अनेक कामे गेल्या दहा वर्षात झाली आहेत .म्हणून आपल्याला मोदी साहेबांच्या पाठीशी उभ राहायचं आहे आणि चारशे पार चा आकडा पूर्ण करायचा आहे, असे विचार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यवतमाळ येथे व्यक्त केले.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आले होते. यावेळी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढी कामे केली आहेत की , ती कार्यकर्त्यांसमोर , लोकांसमोर सांगायला जाताना आपल्याला अभिमान वाटतो , असेही ते पुढे म्हणाले. पूर्वीच्या सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना बंद केल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
जलयुक्त शिवार सारखी योजना बंद केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.याचवेळी राजश्री पाटील यांचेही भाषण झाले. या सभेला, पालकमंत्री संजय राठोड यांचे सह भारतीय जनता पार्टीचे आमदार मदन येरावार, आमदार अशोक ऊईके, राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
ML/ML/SL
4 April 2024