राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये
कर्तृत्त्ववान, युवा उमेदवाराला मत देण्याचे आवाहन
मुंबई, दि. १० – ऱाष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भांडुप पश्चिम येथे येऊन राजुल संजय पाटील यांचा प्रचार केला. राजुल या कष्टाळू, कर्तृत्त्ववान असून आपल मत युवा पिढीच्या राजुल पाटील यांना द्यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
राजुल पाटील या प्रभाग क्रमांक ११४ मधून निवडणुक लढवित आहेत. शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ऱाष्ट्रवादी पक्ष (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार आहेत. निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. राजुल पाटील या तडफदार, युवा नेतृत्व करीत असल्याने त्यांना ११४ प्रभागातील तरुणांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. मतदानाला आता काही दिवसच बाकी असल्याने प्रचाराचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे दिग्गज नेते आता निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडले असून भांडुप पश्चिम येथे राजुल पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहिर, आदेश बांदेकर यांनी हजेरी लावली होती. विकास हा ध्यास असून भांडुपकरांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरवठा करणार, प्रभागातील रस्ते, बेस्ट बसच्या सुविधांमध्ये सुधारणा करु, त्याचप्रमाणे उद्याने, खेळाचे मैदान यासाठी जागा उपलब्ध करुन देऊ. भांडुपकरांना उपचारासाठी राजावाडी किंवा सायन रुग्णालयात जावे लागते. त्यासाठी भांडपमध्येच वैद्यकीय सुविधा मोफत देण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय बांधण्यासाठी प्रयत्न करु असे राजुल पाटील यांनी यावेळी सांगितले.ML/ML/MS