तरुणांनी धोरण निर्मितीला आकार देण्याचे काम करावे – राजोल पाटील

 तरुणांनी धोरण निर्मितीला आकार देण्याचे काम करावे – राजोल पाटील

मुंबई, दि. २ – मारवाडी विद्यापीठ, द सेंटर फॉर युथ पॉलिसी व कोनराड-एडेनॉअर-स्टिफ्टंग (केएएस) इंडिया यांनी राजकोट येथे ‘युवा आणि लोकशाही परिषदे’चे आयोजन केले होते. या परिषदेत निवडून आलेले तरुण लोक प्रतिनिधी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासक यांना एकत्र आणण्यात आले होते. या परिषदेने लोकशाही सहभाग, जागतिक दृष्टिकोन, नागरी तंत्रज्ञान, मीडिया व डिजिटल सार्वजनिक क्षेत्र यावर चर्चा करण्यासाठी एक मौल्यवान व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या परिषदेला नगरसेविका (उबाठा) राजोल संजय पाटील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी त्यांचे विचार मांडले.

सेंटर फॉर युथ पॉलिसी, मारवाडी विद्यापीठ, केएएस आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज यांच्या सहकार्याने सेंटर फॉर युथ पॉलिसीने आयोजित केलेल्या या परिषदेत जगभरातून निवडून आलेले प्रतिनिधी, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी, संशोधन फेलो, पीएचडी स्कॉलर्स, धोरण सल्लागार, खासदार व आमदार एकत्र आले होते. तरुणांनी केवळ राजकारणातच भाग घेऊ नये तर धोरणनिर्मितीला आकार देण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. असे विचार या परिषदेत मांडण्यात आले. आजची तरुण पिढी हि केवळ मतदार नाही तर देशाचे भवितव्य आहे, निर्णय घेणारे व देशाचे शिल्पकार म्हणुन त्यांना मान मिळतो तेव्हा लोकशाही समृद्ध होत असल्याचे मत या ठिकाणी मांडण्यात आले. भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांना देखील या परिषदेचे निमंत्रण देण्यात आले होते.यावेळी त्यांनी त्याचे विचार मांडले.

सुधांशू कौशिक – यंग इंडिया फाउंडेशन, सिमरन धिंग्रा – कोनराड-एडेनॉअर-स्टिफ्टुंग (केएएस) इंडिया,मारवाडी, ध्रुव मारवाडी – मारवाडी चंद्राणा ग्रुप वमारवाडी विद्यापीठ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांचे आभार मानन्यात आले. या परिषदेला जम्मू कश्मीरचे आमदार देवयानी राणा, त्रिपुराचे आमदार पॉल डांगशु, जम्मू कश्मीरचे प्रशासकीय सेवा विभागाचे अना जामवाल व जर्मनी मधील एरफर्ट जिल्ह्यातील नगरसेवक लिली वॉन व्रेडे यांनी आपले मत मांडले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *