देवीचा आशीर्वाद आणि जनसेवेचा ध्यास
होणार सर्वांगीण विकास!

मुंबई, दि २६
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांची कन्या समाजसेविका व शिवसेना कोर कमिटी सदस्य राजोल संजय पाटील यांनी आपल्या विभागातल्या विविध नवरात्री मंडळांना भेट दिली व महालक्ष्मीचे दर्शन घेतले.


घाटकोपर पूर्व परिसरातील उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहून खूप छान वाटले. देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहो हीच प्रार्थना! असे यावेळी रजोल पाटील म्हणाल्या.

देव दर्शन आणि काम हे एकत्र करत रजोल पाटील यांनी भांडूप येथील पाटील वाडी, टॅंक रोड येथे गटारे आणि लादीकरण कामाचा शुभारंभ केले.
यावेळी आलेल्या लोकांशी बोलताना त्या म्हणाल्या की…कामांमुळे परिसराच्या पायाभूत सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा होऊन नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेसाठी ही कामे महत्वाची ठरणार आहेत. यापुढेही स्थानिकांसाठी अशा विकासकामांना गती देत राहू.

तसेच विद्याविहार पश्चिम येथील स्काय लाईन ओएसिस या संकुलाच्या पाणी समस्यांबाबत महापालिकेतील जल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भेट घेतली.ML/ML/MS