राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी करण्यात आलं पूजन…

 राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी करण्यात आलं पूजन…

बुलडाणा, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज 426 वी जयंती …राष्ट्रमाता जिजाऊचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात आज जिजाऊ जन्मउत्सव सोहळा पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात आला.

जिजाऊ जन्मउत्सव सोहळया निमित्य राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आले आहे… तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरीक येत होते .

सकाळीच राजे लखोजी जाधव यांचे वंशज यांनी राजमाता जिजाऊची आरती केली आणि जिजाऊ वंदन केले त्यानंतर राजवाडा परिसरामध्ये फटाक्याची आतिश बाजी करत जन्मोत्सव सोहळा साजरा केल्या गेला. सकाळपासूनच राज्यातील विविध जिल्हयातून नागरीक जिजाऊच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करीत होते. त्यामुळे सिदखेडाराजा येथे मोठया प्रमाणात गर्दी झाली आहे…

ML/KA/PGB 12 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *