येत्या बारा तारखेला अमित शहा रायगड किल्ल्यावर

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या बारा तारखेला किल्ले रायगड वरील शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत.
शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता. समृद्ध मराठा शासन काळाचे प्रतीक म्हणून ही त्याकडे पाहिले जाते. महाराजांच्या दूरदृष्टीने आखलेल्या अनेक यशस्वी मोहिमांचा हा गड साक्षीदार आहे. इथे येऊन नव्या पिढीला मराठा साम्राज्याची आठवण ताजी करून घेऊन, आपल्या राजाच्या अद्वितीय पराक्रमाच्या गोष्टींची उजळणी देखील करता येऊ शकते.
ML/ML/PGB 6 April 2025