पत्रकार राजेश शेटकर यांनी वाचवले 3 वर्ष्याच्या मुलाचे प्राण.

 पत्रकार राजेश शेटकर यांनी वाचवले 3 वर्ष्याच्या मुलाचे प्राण.

ठाणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिरानंदानी इस्टेट , क्लब हाऊस मध्ये काल रात्री अर्थात रविवारी आठच्या सुमारास पत्रकार राजेश शेटकर यांनी एका तीन वर्षीय लहान मुलाला पाण्यात बुडताना वाचवले आहे.

क्लब हाऊस मधील तरण तलावात नेहमीप्रमाणे संध्याकाळी सातच्या बॅचला सभासदांची गर्दी झाली. या गर्दीमध्ये पत्रकार राजेश शेटकर हे देखील होते. तरण तलावात मुक्त विहार करताना, सुमारे आठच्या सुमारास एक लहान मुलगा पाण्यात पडल्याचे राजेश शेटकर यांच्या लक्षात आले. त्या मुलाकडे कोणाचेही लक्ष नव्हते असे दिसून आले. पाण्यात हा मुलगा खाली तळाला जात आहे हे लक्षात येताच पत्रकार राजेश शेटकर लगबगीने त्या मुलाच्या दिशेने जाऊन त्याला पाण्यातून वर काढले, दोन्ही हाताने मुलांना वर घेऊन जोरात आवाज दिला हा मुलगा कोणाचा आहे. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष राजेश शेटकर यांच्याकडे गेले. मोबाईल मध्ये व्यस्त असलेल्या त्या मुलाच्या वडिलांना मुलगा कधी पाण्यात पडला आहे त्यांना लक्षात आलं नाही.

आपला मुलगा पाण्यात पडलेला पाहून लगेचच ते शेटकर यांच्याकडे गेले आणि तिथेच त्या मुलाची आई देखील पोहण्याचा सराव करत होती. तीसुद्धा त्वरित जवळ आली. आपल्या मुलाला पाण्यात बघून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या मुलाचे प्राण राजेश शेटकर यांनी वाचवले याची जाणीव त्यांना झाली आणि दोघांनीही राजेश शेटकर यांचे आभार व्यक्त केले. झालेल्या प्रकारात लहान मुलाच्या वडिलांचे हलगर्जीपणा असला तरी देखील क्लब हाऊस च्या सुरक्षारक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ML/ML/PGB
23 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *