राजभवन येथे पं.दीनदयाल उपाध्याय यांना आदरांजली

मुंबई दि २५ : एकात्म मानवतावादाचे उद्गाते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) राजभवन येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांना आदरांजली वाहण्यात आली.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दिनांक २५ सप्टेंबर ही पं.दीनदयाल उपाध्याय यांची जयंती ‘अंत्योदय दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते.

Raj Bhavan pays tributes to Pt Deendayal Upadhyaya on Jayanti. ML/ML/MS