राजभवन हा एका राजकीय पक्षाच्या कट करस्थानाचा अड्डा ….
नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे राजभवन rajbhavan हे एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या कट करस्थानाचे अड्डा बनले आहे , राष्ट्रपुरुष आणि थोर नेत्यांबद्दलची बेताल वक्तव्ये, सीमाप्रश्नावर बोटचेपी भूमिका, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसाभरपाई या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. हे बहिष्काराचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे असंही ते म्हणाले.स्वविचार आणि महाराष्ट्र हिताचा निर्णय घेण्याचा अभाव सरकारमध्ये आल्याने चहापानासाठी येणे योग्य वाटत नसल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी पत्रात म्हटले आहे.
अधिवेशनाचा कालावधी वाढवून तो तीन आठवड्याचा करावा अशी मागणी आम्ही केली आहे , गरज भासल्यास अधिक काळ कामकाज करावे , सर्व प्रकारच्या चर्चेला आम्ही तयार आहोत, मात्र अधिक काळ काम चालावे अशी मागणी आम्ही केली आहे असं त्यांनी सांगितले . विदर्भाच्या अनेक विकास कामना आम्ही आमच्या काळात चालना दिली , निधी दिला तरीही आमच्यावर धादांत खोटे आरोप केले जात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात तातडीने बदल करणे हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे असे नाना पटोले यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावे अशीच आमची भूमिका आहे असेअंबादास दानवे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
ML/KA/PGB
18 Dec 2022