छत्तीसगड आणि म. प्र. मुख्यमंत्री पदासाठी मिळाले नवे कोरे चेहरे

 छत्तीसगड आणि म. प्र. मुख्यमंत्री पदासाठी मिळाले नवे कोरे चेहरे

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपने छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहऱ्यांची नियुक्ती करुन मतदारांना आणि मुख्यमंत्रीपदाच्या परंपरागत दावेदारांना धक्का दिली आहे. मोहन यादव यांची मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तर विष्णुदेव साय यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आज भाजपने जाहीर केले.

मोहन यादव उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार आहेत. आमदार यादव हे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील.मोहन यादव हे उज्जैन विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. तसेच शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमध्ये त्यांनी शिक्षण मंत्री जबाबदारी सांभाळली आहे. तसेच २०११-१२ आणि २०१२-१३ मध्ये मध्य प्रदेशातील पर्यटन विकासासाठी राष्ट्रपतींनी मोहन यादव यांना पुरस्कार दिला होता.

छत्तीसगडचे नवे मुख्यंत्री विष्णुदेव साय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आदिवासी समुदायाचे नेते आहेत. त्यांनी चार वेळा खासदार व माजी केंद्रीय मंत्री पद भूषवले आहे, रायपूरमध्ये ५४ सदस्यीय भाजप विधिमंडळ पक्षाने रविवारच्या बैठकीत सर्वानुमते ५९ वर्षीय साय यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्रीही असतील. त्यासाठी अरुण राव आणि विजय शर्मा पुढे आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह सभापती होणार आहेत.

दोनदा प्रदेशाध्यक्ष राहिलेले विष्णुदेव राज्याचे दुसरे व भाजपचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी काँग्रेसचा आदिवासी चेहरा म्हणून अजित जोगी २००३ पर्यंत सीएम होते. तथापि, ते जातीमुळे वादग्रस्त ठरले. दरम्यान राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर अद्याप चर्चांचा फेैरी सुरुच आहेत.

SL/KA/SL

11 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *