राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या इच्छेच्या वृत्ताबाबत राजभवनाचं स्पष्टीकरण

 राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या इच्छेच्या वृत्ताबाबत राजभवनाचं स्पष्टीकरण

मुंबई,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले दिसत आहे. शिवरायांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टिका केली जात आहे.राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आता राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त काही माध्यमांवर झळकले आणि व्हायरल झाले. याबाबत राजभवनाने स्पष्टीकरण दिले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्त होण्याबद्दल माध्यमांत सुरु असलेल्या चर्चा अफवा आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, असे राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.

SL/KA/SL

28 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *