विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाची धुंवाधार बॅटिंग..
सांगली, दि. 7(एमएमसी न्यूज नेटवर्क): अवकाळी पावसाने सांगली शहरासह जिल्ह्याला जोडपून काढला आहे.वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार,असा पाऊस जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पडला आहे.अचानक पडलेल्या या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधा तिरपट उडाली तर जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी हवालादिल झाला आहे.सकाळपासून सांगली जिल्ह्यातल्या तापमान प्रचंड वाढला होते,त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.आणि अचानक सायंकाळनंतर मिरज,पलूस, विटा तालुक्यासह सांगली आणि मिरज शहरात मुसळधार,असा पाऊस पडला आहे.वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पडलेल्या धुंवाधार पाऊसाने सर्वसामान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे,तर या अवकाळी पाऊसाचा फटका जिल्ह्यातल्या द्राक्ष आणि बेदाणा निर्मितीला होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ML/KA/PGB 7 May 2023