अवकाळी पावसाने विजांचा कडकडाटासह पोलादपूर, महाड तालुक्याला झोडपले.

महाड दि १५ — रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यांत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस दुपारी हजेरी लावत असून बुधवारी पुन्हा पोलादपूर तालुक्याचा अवकाळीने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर बाजीरे गावच्या हद्दीमध्ये रस्त्यावर डोंगरावरील माती आल्यामुळे मोटरसायकल स्वार चालक, चारचाकी वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला.
मातीचा काही भाग रस्त्यावर आल्याने रस्ता चिकट झाला होता. त्यामुळे वाहने स्लिप होऊन अपघाताची भीती निर्माण झाली होती. रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये मागील चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दुपारच्या दरम्यान पडत असून बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने पोलादपूर तालुक्यात हजेरी लावत अक्षरशः झोडपून काढलेले आहे त्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली आहे.
जवळपास तासभर पडलेल्या जोरदार पडलेल्या पावसामुळे वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. मागील चार दिवस जोरदार पडत असलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झालेले असून तालुक्यातील अनेक भागांमध्ये झाड पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे सर्वत्र तालुक्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
ML.MS