जालन्यात जोरदार पावसाची हजेरी.छोट्या – मोठ्या ओढ्यांना आला पूर…

 जालन्यात जोरदार पावसाची हजेरी.छोट्या – मोठ्या ओढ्यांना आला पूर…

जालना दि १३– जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी, कुंभारी, लिंगेवाडी, बेलोरा यासह आसपासच्या गावात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. पावसाचा जोर इतका होता की छोटे-मोठे ओढे खळखळून वाहायला लागलेत. यामुळे रस्त्याच्यावरून ओढ्यांचे पाणी वाहत असल्याने नागरिकांची ये – जा करायला प्रचंड गैरसोय होतेय. दरम्यान, जालना जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून हवामान विभागाकडून पुढील काही दिवस विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *