वाशीमच्या आकाशात परतीच्या पावसात उमटले सप्तरंगी इंद्रधनुष्य

 वाशीमच्या आकाशात परतीच्या पावसात उमटले सप्तरंगी इंद्रधनुष्य

वाशीम दि २६ : एरवी श्रावण महिन्यात उन, सावली आणि पावसाच्या खेळात दिसणारे सप्तरंगी इंद्रधनुष्याचे आज परतीच्या पावसाच्या सरींमध्ये वाशीमच्या पूर्व क्षितिजावर दर्शन झाले. सांयकाळच्या वेळी झालेल्या हलक्या सरी आणि मधूनच पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या संगतीत तयार झालेल्या या इंद्रधनुष्याने आकाशात निसर्गाची अद्भुत रंगछटा खुलवली. परतीच्या पावसामुळे दिवसभर वातावरण ढगाळ राहिले होते.

सायंकाळी हलकासा पाऊस आणि सोनेरी उन्हाच्या संगमातून क्षितिजावर दिसलेले हे इंद्रधनुष्य काही वेळासाठीच टिकले, परंतु त्याच्या सौंदर्याने वाशीमकर मंत्रमुग्ध झाले. शहराच्या पूर्व भागात दिसलेल्या या मोहक दृश्याने अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात ते कैद केले. सोशल मीडियावर या इंद्रधनुष्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले.

सध्या जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या सरी अधूनमधून बरसत आहेत. या उन्हाळी-पावसाळी वातावरणामुळे आकाशात इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. आकाशभर पसरलेल्या या सप्तरंगी रंगांनी निसर्गाने पुन्हा एकदा आपली कलाकारी सादर केली.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *