पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? घ्या या ५ गोष्टींची काळजी
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुम्हीही पावसाळ्यात उत्तराखंड, हिमाचल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर आधी तेथील हवामान कसे आहे ते जाणून घ्या. तुमचे तिकडे जाणे व्यर्थ ठरू नये. कारण या ऋतूत बहुतांशी ठिकाणी रेड अलर्ट असतो. तर काही ठिकाणी विशेष काळजी घेऊन जावी लागते.
डोंगराळ भागात कुठेतरी मुक्काम करण्यापूर्वी, पर्वत आणि नदीच्या पायथ्यापासून दूर असलेल्या ठिकाणी हॉटेल निवडणे योग्य राहील. कारण पावसाळ्यात पूर येऊ शकतो शिवाय अनेकवेळा अशा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात जेव्हा तुम्ही फिरायला जात असाल आणि ते ठिकाण अगदीच डोंगराळ भागात असेल. किंवा उत्तराखंड आणि हिमाचलला जात असाल, तेव्हा तुम्ही सतत थोड्या-थोड्या वेळाने आपल्या जवळील एखाद्या तरी व्यक्तीला अपडेट करत राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती आली तर ते तुम्हाला मदत करू शकतील.
पावसाळ्यात फिरायला जाताना प्रथमोपचार बॉक्स सोबत असणे गरजेचे आहे. यामध्ये बँडेज, जंतुनाशक औषधे, डासांसाठी काही औषधे, डोकेदुखी, पित्त, सर्दी, खोकला, ताप अशी औषधे असणे गरजेचे आहे.
PGB/ML/PGB
3 Aug 2024