सांगलीत पाऊस, धरणासाठा सुधारला

सांगली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील अनेक भागात गेले काही दिवस चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणसाठा सुधारला आहे .वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. Rain in Sangli, dam storage improved
विविध धरणातील पाणीसाठा आणि साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 92.06 (105.25), धोम 10.18 (13.50), कन्हेर 8.19 (10.10), वारणा 34.40 (34.40), दूधगंगा 24.09 (25.40), राधानगरी 8.15 (8.36), तुळशी 2.96 (3.47), कासारी 2.77 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), धोम बलकवडी 3.90 (4.08), उरमोडी 5.62 (9.97), तारळी 5.54 (5.85), अलमट्टी 109.13 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी आणि कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 10 (40) , अंकली पूल हरिपूर 5.3 (45.11). कालवा आणि विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1050, धोम 1023, कण्हेर 875, वारणा 1455, तुळशी 600, पाटगाव 250, धोम बलकवडी 340 व अलमट्टी धरणातून 10 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
ML/KA/PGB
29 Sep 2023