निम्म्या पावसाळ्यातही एकबुर्जी प्रकल्प तहानलेलाच!

वाशिम, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ ३२.६६ टक्के एवढाच पाणीसाठा असून पावसाळा अर्धा होऊन गेला तरीही प्रकल्पातील पाणी पातळी न वाढल्यानं वाशिम शहरवासीयांची चिंता वाढली आहे. सध्या शहराला नगरपरिषदेकडून दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान जिल्ह्यातील इतर दोन मध्यम प्रकल्पाची स्थिती मात्र उत्तम आहे. त्यामध्ये सोनल प्रकल्प १०० टक्के भरला असून अडान प्रकल्पामध्ये सध्या ६८ टक्के इतका पाणीसाठा आहे. या दोन्ही धरणातून विसर्गही सुरू करण्यात आला आहे.
ML/ML/PGB
4 Aug 2024