वादळी पावसाने ज्वारी , कापूस ,मका पिकांचे अतोनात नुकसान
छ. संभाजीनगर दि ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे ज्वारी, कापूस , मका आदी पिकांचे नुकसान शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस बरसल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वेचणीस आलेल्या कापसाच्या अवकाळी पावसाने वाती झाल्या असून काढणीस आलेले ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. ढगाळ वातावरणाने अवकाळी पावसाने कांदा, गहू , मका, हरबरा पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे पिकांना फटका बसला आहे.
अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने नरसापूर, सारंगपूर, दहेगाव बंगला, मुरमी परिसरात हुरडा उत्पादक शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरवला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
ML/KA/SL
30 Nov. 2023