पुढील ३ ते ४ दिवस वरुणराजा बरसणार, २१ जिल्हांना Yellow Alert
पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील बहुतांश ठिकाणी महिन्याभराहून अधिककाळ पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. उभी पिके पाण्याअभावी वाळू लागली असताना बळीराजासाठी पुन्हा एकदा वरुणराजा बरसणार असल्याची आनंदीची बातमी आज हवामान विभागाने दिली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे.येत्या ३ ते ४ दिवस समाधानकारक पाऊस होणार असून राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने Yello Alert जाहीर केला आहे.
उद्या २१ जिल्ह्यांना Yellow Alert
पावसाचा जोर राज्यभरात कायम राहणार आहे. त्यातच रविवारी राज्यातील 21 जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
हवामान विभागाने आज विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच उद्या म्हणजेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेडया जिल्ह्यांमध्येही उद्या ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात विजांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
पावसाने दडी मारल्याने बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलं होतं. तसेच धरणातील पाणी साठा सुद्धा कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उभा राहिला होता. पण आता पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
SL/KA/SL
2 Sept. 2023