आज पुन्हा वादळीवारा गारपिटीसह अवकाळी पाऊस…

 आज पुन्हा वादळीवारा गारपिटीसह अवकाळी पाऊस…

नाशिक, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, सटाणा, देवळा, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, सिन्नर, निफाड आदी तालुक्यात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाट आणि गारपिटीसह अवकाळी पाऊस सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे छोट्या मोठ्या दुकानदारांचा माल ओला झाल्याने एकच धावपळ उडाली आहे. शहरात बहुतांश ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत.गेल्या पंधरा दिवसापासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे द्राक्ष, कांदा, गहू या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

SL/KA/PGB 14 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *